आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔद्योगिक क्षेत्रात गेल्या ६० वर्षापासून अविरत सेवा बजावणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या फांद्या व मुळ्या सर्वत्र पसरवत राज्यातील इतर महामंडळाच्या तुलनेत एमआयडीसीचे कार्य उल्लेखनीय रहावे यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले आहे.
एमआयडीसीच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, शशिकांत पाटील, नितीन पाटील, जयंत पवार, सुधीर चावरकर, विजय चौधरी, महेंद्र साळी, बंडू शेवाळे आदी उपस्थित होते. कोरोनाकाळात नाशिक विभागाने केलेल्या कार्याची दखल मुख्यालयाने घेतली असून महाराष्ट्रात नाशिकचे नाव अग्रस्थानी घेतले जात असून नाशिक विभागाचे कौतुक केले जात असल्याकडे झंजे यांनी लक्ष वेधले. ज्या संस्थेचे आपण घटक आहोत त्या संस्थेच्या नाव लौकिकासाठी अहोरात्र झटणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे मत प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी व्यक्त केले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा, इयत्ता दहावी व बारावीत यश संपादन केलेल्या एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा व २५ वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.