आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Midnight Raid On Hookah Party, 55 Arrested; Illegal Hookah Party, Action By Rural Police On Farm House Near Gangapur Dam During Night Curfew Nashik News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:हुक्का पार्टीवर मध्यरात्री छापा, 55 जणांना अटक; रात्रीची संचारबंदी सुरू असताना गंगापूर धरणालगत फार्म हाऊसवर अवैध हुक्का पार्टी, ग्रामीण पोलिसांची कारवाई

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाबाबत गांभीर्याचा अभाव, कठोर कारवाई गरजेची

गंगापूर धरणालगत एका फार्म हाऊसमध्ये अवैध सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ग्रामीण पाेलिसांनी मध्यरात्री छापा टाकून हुक्का पिणाऱ्या ३८ तरुण-तरुणींसह रिसॉर्ट मालक व कामगार अशा एकूण ५५ संशयितांना अटक करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू असताना ही हुक्का पार्टी सुरू होती. या प्रकरणी इलाका रिसॉर्टचे मालक गौरव मौले यांच्यासह ३८ ग्राहकांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर कोरोना नियमांचा भंग करत मध्यरात्री सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. शेजारी हुक्का पार्टी जेथे सुरू होती
गंभीर कोरोना नियमांचा भंग करत मध्यरात्री सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. शेजारी हुक्का पार्टी जेथे सुरू होती

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत गंगापूर धरण परिसरातील सावरगाव शिवारात हॉटेल इलाका रिसॉर्ट येथे गर्दी जमा करत अवैधरीत्या हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. शनिवारी मध्यरात्री दाेनला त्यांनी विशेष पथकाला सूचना दिल्या व स्वतः कारवाईचे सूत्र हाती घेत छापा टाकला. रिसॉर्टमध्ये तरुण व तरुणी हुक्का पार्टी करत असल्याचे दिसले. झडतीत विविध प्रकारची सुगंधित तंबाखू व हुक्का पाॅट अाढळले. संशयितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमासह सिगारेट व तंबाखू उत्पादन अधिनियम कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षकांकडे आल्या तक्रारी
ग्रामीण पोलिस हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याची माहिती खुद्द पोलिस अधीक्षकांना मिळत आहे. या आधारे अधीक्षक तत्काळ कारवाई करत असल्याने ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह बीट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अवैध धंद्यांचे पाळेमुळे उखडणार
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे पाळेमुळे मुळासकट उखडून टाकणार आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत धंदे सुरू असतील त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक

कोरोनाबाबत गांभीर्याचा अभाव, कठोर कारवाई गरजेची
शहरासह जिल्ह्यात काेराेनाचा वेगाने प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी जारी करण्यात अाली अाहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी दाैरा करत नागरिकांना मास्क वापरण्याचे व नियम पाळण्याचे अावाहन केले अाहे. असे असताना शहरातील महाराष्ट्र पाेलिस अकादमीत दीक्षांत साेहळ्यापूर्वीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात काेराेनाचे नियम ताेडत भावी उपनिरीक्षकांनी धांगडधिंगा घातला. यानंतर गंगापूर धरणालगतच्या फार्म हाऊसमध्ये मध्यरात्रीपर्यंत अवैधरीत्या हुक्का पार्टी रंगत असल्याचे दिसले. या दाेन्ही घटनांवरून नागरिकांना काेराेनाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत अाहे. यामुळे अाता यंत्रणेला कठाेर कारवाई करणे हाच उपाय याेजावा लागणार अाहे.

इतरत्रही हुक्का पार्टी सुरू असल्याची चर्चा
शहरालगत असलेल्या फार्म हाऊस आणि हॉटेल, रिसॉर्टमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची चर्चा आहे. या कारवाईने शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे.

बातम्या आणखी आहेत...