आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये माल वाहतूक ट्रकांची तपासणी:खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाची मध्यरात्री शोधमोहीम

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याने​​​​​​ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे. मात्र या दरम्यान खतांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आक्रमक झालेल्या कृषी विभागाने रात्रंदिवस शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 21 जून सव्वा दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरारी पथकाने अंजनेरी, साकुर फाटा, घोटी येथे माल वाहतूक ट्रक ची तपासणी करीत खतांचा शोध घेतला.

नाशिक जिल्ह्यातील शेतीला अनुकूल वातावरण असल्याने सर्व प्रकारची पिके घेतली जातात. हवामान विभागाने 22 जून पासून राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकरी यांनी भात रोप, मका, सोयाबीन, कापूस लागवडीसाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कापूस बियाणे चे अनाधिकृत एटीबीटीची विक्री होत असल्याचे प्रकार धुळे जिल्ह्यात उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे आणि खते( युरिया) यांचा काळाबाजार होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी मध्यरात्री देखील शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, पंचायत समिती कृषी अधिकारी सुनील विटनोर, कैलास भदाणे हे शोध मोहिमेत सहभागी झाले होते.