आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवासी मजुर:कडक उन्हात अनवानी पायाने चालणाऱ्या मजुरांचा प्रवास; अनेकांच्या पायाचे निघाले कातडे, तर काहीजण सायलकवरुन करत आहेत शेकडो किमीचा प्रवास

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • रात्री चालल्यामुळे जेवण मिळत नाही, म्हणून दिवस रात्र चालत आहेत

जेपी पवार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सध्याचे चित्र थक्क करणारे आहे. मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यांच्या चपला तर सोडाच शरीर झाकण्यासाठी अंगभर कपडे सुद्धा नाहीत. तडपत्या उन्हात ते पायी चालणाऱ्या या मजुरांचे पाय अक्षरशः भाजले आहेत. पूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. हातात काही सामान आणि डोक्यावर गठोळे घेऊन हे लोक चालत आहेत. यातील काही मजूर मध्य प्रदेशचे, यूपीचे, बिहारचे तर काही पश्चिम बंगाल आणि राजस्थानचे आहेत. लॉकडाउन घोषित झाला तेव्हापासून हे लोक मुंबईतच अडकले होते. त्यांच्याकडे खाण्या-पिण्यासाठी काहीच उरले नव्हते. रोजगार नसल्याने त्यांच्या भीक मागण्याची वेळ आली होती. गमवण्यासाठी काहीच नसल्याने कशाचीच परवा न करता हे लोक आपल्या घरी पोहोचण्याच्या आशेने निघाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चालणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्स्या, ऑटो, ट्रक आणि सायकल असेल ते घेऊन या लोकांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. एका-एका तीनचाकी ऑटोमध्ये 6 ते 7 जण निघत आहेत.

ऑटोमध्ये साहित्य भरलेली आहे. त्यावरच लोक बसलेले दिसून येतात. एका दिवशी अशा प्रकारचे ऑटो केवळ 40-50 किमी चालू शकतात. त्यामुळे, लोकांना आप-आपल्या घरी पोहोचण्यासाठी 7 ते 8 दिवस सुद्धा लागू शकतात. बहुतांश ऑटो सीएनजीवर चालणारे आहेत. परंतु, या हायवेवर सीएनजी स्टेशन सुद्धा मिळत नाहीत. पेट्रोल पंप सुरू आहेत. त्यामुळे, या गाड्यांना पेट्रोलमध्ये कंव्हर्ट करून लोक मुंबईतून निघाले आहेत. संपूर्ण मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने एमएच 47, एमएच 02, एमएच 03, एमएच 04, एमएच 47, एमएच 46 क्रमांकाचे ऑटो पाहायला मिळत आहेतत. यात काही ट्रक सुद्धा आहेत. हे सुद्धा कुठे ना कुठे अडकले होते. हे लोक मजूरांकडून वाट्टेल ते पैसे वसूल करत आहेत. विशेष म्हणजे, घरी जाण्याच्या आशेने निघणाऱ्या या मजुरांकडे जेवण्यासाठी देखील काहीच नाही.

अनेक सामाजिक संस्था यांना जेवण देत आहेत

नाशिक आणि मुंबईदरम्यान 180 किमीचे अंतर आहे. यादरम्यान दोन घाट आहेत. हा परिसर एकदम नीर्जण असतो. या घाटांना कोणी सायकलवरुन तर कोणी पायी चालत पार केले. या सर्वांना जेवण नाशिकजवळ आल्यावरच मिळाले. येथे काही सामाजिक संस्था प्रशासनासोबत मिळून अन्न पुरवत आहेत. नाशिकमधील अंगुर लोकप्रिय आहेत, परंतू बाजारात विकल्या जात नसल्यामुळे शेतकरी हे अंगुर या प्रवासी मजुरांना देत आहेत.

कादवा नदीवर कुंभसारखे दृष्य

प्रवासी मजुर रस्त्यात येणाऱ्या नद्यांमध्ये जाऊन अंघोल करत आहेत. रस्त्यालगतच्या झाडांमध्ये आराम करत आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या कादवा नदीवर कुंभसारखे दृष्य दिसत आहेत. हजारोंच्या संख्येने मजुर नदीवर अंघोळ करत आहेत, ज्यांच्याकडे पाणी नाही, असे लोक पाणी भरुन घेत आहेत. भर उन्हात नदीवर कुंभ मेळ्यादरम्यान असते, तेवठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दिवसभर उन्हात चालतात, रात्री जेवण मिळत नाही

मजुर दिवसा कमी आणि रात्री जास्त प्रवास करत आहेत. परंतू, रात्री त्यांना कुठेच अन्न मिळत नाहीये. दिवसा अनेक सामाजिक संस्था त्यांना जेवण देतात, म्हणून अनेकवेळा त्यांना रात्रीऐवजी दिवसा भर उन्हात चालावे लागत आहे.

सायकलने नाशिकवरुन मालेगावला जाणारा एक समुह मला भेटला

मी त्यांना विचारले, तुम्ही कुठु आलात आणि कुठे जात आहेत. त्यावर ते मजुर म्हणाले की, आम्ही गुजरातच्या विक्रमगडवरुन चालत आलोत आणि आम्हाला नागपूरला जायचे आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने बस सेवा सुरू केली आहे. ही बस मुंबईवरुन सेंधवापर्यंत जाते. सेंधवावरुन मजुर मप्र, यूपी, बिहारसाठी आपल्या पद्धतीने जात आहेत. मजुरांचे म्हणने आहे की, मुंबईला थांबलो असतो, तर मेलो असतोत. म्हणून आम्ही पायी निघालो आहोत. 17 मे नंतर लॉकडाउन वाढेल अशी अनेकांना भीत असल्यामुळे लोक आपापल्या गावी निघाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...