आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालापाचोळा:कृष्णनगर उद्यानातील मिनी ट्रेन गंजली ; देखभाल-दुरुस्ती हाेत नसल्याने उद्यानात कचरा साठला

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटीतील कृष्णनगर येथील सर्वात अधिक सुशोभिकरण केेलेल्या उद्यानाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. या उद्यानातील मुलांसाठी असेलेली मिनी ट्रेन गंजली असून ती धाेकेदायक ठरली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कृष्णनगरातील या उद्यानाची देखभाल-दुरुस्ती हाेत नसल्याने उद्यानात कचरा साठला आहे. झाडांचा पालापाचोळा पडून असल्याने त्यात सरपटणारे प्राणी वाढले आहेत. पंचवटीमधील सर्वात माेठ्या अशा या उद्यानाची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करावे व नियमित साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...