आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Minister Girish Mahajan's Information Behind Dahihandi, Ganeshotsav Period Crimes; Bappa Left To The Sound Of Drums; Mahajan Played The Drum

दहीहंडी, गणेशोत्सवकाळातील गुन्हे मागे:मंत्री गिरीश महाजनांची माहिती; ढोल ताशांच्या गजरात बाप्पा निघाले; महाजनांनी वाजवला ढोल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीची सुरुवात गणरायाची आरती करून केला आहे.

जळगावात बाप्पांची निघालेली मिरवणूक.
जळगावात बाप्पांची निघालेली मिरवणूक.

जुने नाशिक येथील वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. महाजन यांनी सांगितले की, यापूर्वी दहीहंडी गणेशोत्सव या काळात काही कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रॅक्टरमधून बाप्पांची निघालेली मिरवणूक सोबत गणेशभक्त.
ट्रॅक्टरमधून बाप्पांची निघालेली मिरवणूक सोबत गणेशभक्त.

यावेळी सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी असून त्यानंतर शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बाप्पाचे दिमाखात आगमन झाले. त्यानंतर दहा दिवसांच्या आनंदायक वातावरणात बाप्पाचा सोहळा पार पडला. मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणेशाचे नाशिकरांनी दर्शन घेतले. मात्र शुक्रवारी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे.

मंत्री गिरीश महाजन ढोल वाजवताना.
मंत्री गिरीश महाजन ढोल वाजवताना.

शहरात पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात महापालिकेचे गणपतीची मिरवणूक सुरू करण्यात आली.शहरात गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या पाऊस मध्यरात्रीपर्यंत होता. त्यामुळे शहर परिसरात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडिप दिली असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. दरम्यान,गोदावरीसह अन्य नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने नदीपात्रात मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याऐवजी विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारले जात आहे.

वाहनावर काढण्यात आलेली गणपती बाप्पांची मिरवणूक.
वाहनावर काढण्यात आलेली गणपती बाप्पांची मिरवणूक.

शुक्रवारी दुपारपर्यंत नाशिक शहराच्या विविध भागातून 17 हजारांवर विसर्जित मूर्तीचे दान संकलित करण्यात आले आहे. सर्वात जास्त आठ हजारहून अधिक मूर्ती पंचवटी विभागातून प्राप्त झाल्या आहेत. नाशिक शहरात गोदावरीचे प्रदूषण हा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे गेल्या सुमारे 25 वर्षांपासून नदी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य आणि गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्यास मनाई केली जाते.सायंकाळी मूर्तींचे दानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...