आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम‎ मुदत:बीएएमएस''च्या अनेक प्रवेश‎ अर्जांमध्ये विद्यार्थ्यांकडून चुका‎ ; दुरुस्तीच्या पर्यायाची मागणी‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीएएमएसच्या पदव्युत्तर पदवी‎ अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी‎ गुरुवार (दि.५) जानेवारी ही अंतिम‎ मुदत आहे. प्रवेश अर्ज करताना‎ अनेक विद्यार्थ्यांकडून चुका झालेल्या‎ आहेत. मात्र, महासीईटी‎ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेश‎ अर्जात दुरुस्ती करण्यासाठी पर्यायच‎ (करेक्शन विंडो) उपलब्ध नसल्याने‎ विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला‎ आहे. निवड यादी जाहीर होण्यापूर्वी‎ संकेतस्थळावर प्रवेश अर्जात दुरुस्ती‎ करण्यासाठी संधी उपलब्ध करून‎ देण्याची मागणी नाशिकसह‎ राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून‎ करण्यात आली आहे. बीएएमएसच्या‎ पदवी परीक्षानंतर पीजीच्या‎ प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात‎ आली. सीईटीचा निकाल जाहीर‎ झाल्यानंतर ३० डिसेंबरपासून प्रवेश‎ अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.‎

दुरुस्तीचा पर्याय सुरू करा‎ प्रवेश अर्जात अनेक‎ विद्यार्थ्यांकडून प्रवर्ग व शैक्षणिक‎ माहिती, वैयक्तिक माहिती भरताना‎ चुका झालेल्या आहेत. त्यामुळे‎ शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,‎ यासाठी सीईटी सेलने प्रवेश‎ अर्जाच्या मुदतीत वाढ करावी.‎ दुरुस्तीचा पर्याय द्यावा.‎ - यश शिरसाठ, विद्यार्थी‎

बातम्या आणखी आहेत...