आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन आर्ट थीमवर यंदा रंगणार मिस्तुरा फेस्ट:कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, हॅण्डमेड दागिन्यांसह खाद्य पदार्थांचेही असतील स्टॉल

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपिठ मिळावे याच बरोबर कलाकारांनी नव्या युगाशी सांगड घालावी या दृष्टीने शौर्य फाउंडेशनच्या वतीने मिस्तुरा आर्ट फेस्टचे आयाेजन करण्यात आले आहे.

ओपन आर्ट अशी यंदाच्या फेस्टची थिम असणार आहे. 24 व 25 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 पर्यंत गंगापुर रोड येथील गोदावरी नदी काठी, गोदा पार्क, सुयोजित व्हॅली या ठिकाणी हा आर्ट फेस्ट होणार आहे.

या फेस्ट मध्ये कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, हॅण्डमेड दागिने व खाद्य पदार्थ यांसारखे स्टॉल पाहायला मिळतील. याशिवाय शहरातील नामांकित कलाकारांनी व विद्यार्थींनी तयार केलेल्या विविध कलाकृती व इन्स्टॉलेशन देखील उभ्या केल्या जाणार आहेत. तसेच कला प्रेमींसाठी विविध फोटो प्रदर्शन व चित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रामुख्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन देखील विद्यार्थीच करत असतात.

शहरातील हजारो विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभाग मिस्तुराची विशेष ओळख बनत चालल्याचे आयोजक सांगतात. कलेची आवड़ असणाऱ्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. या वर्षी होणाऱ्या फेस्टमध्ये या सगळ्या गोष्टींसह 100 हून अधिक कलाकार कला सादरीकरण करणार आहेत. या शिवाय म्युझिकल नाईट, ढोल परर्फोर्मंन्स, लाईव्ह पेंटिंग, रॉक बॅंड, क्लासिकल आणि फोक संगीत आदीचे खास आकर्षण असणार आहे. फेस्टमध्ये सर्वांसाठी प्रवेश हा मोफत असणार आहे या फेस्टमध्ये माेठ्या संख्येयेन नाशिककरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे असणार फेस्टचे आकर्षण

फ्ली बाज़ार, रॉक बॅड, फैशन शो, चित्र प्रदर्शनी, ढोल, फोक संगीत हे या फेस्टचे प्रमुख आर्कषण असणार आहे.फेस्टच्या निमित्ताने 25 स्टाॅल उभारण्यात येणार आहे. या फेस्टच्या माध्यमातून तब्बल 2 वर्षानी पुन्हा एकदा नाशिक स्थित कलाकार या निमित्ताने एकत्र येताना दिसतील.या माध्यामातून शहरातील कलाकरांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यास व्यासपीठ उपलब्ध हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...