आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित‎ विकासकामांना गती:श्रीरामपूर शिष्टमंडळाचे कामांबद्दल आमदारांना साकडे‎

देवळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर येथील ग्रामपंचायत‎ शिष्टमंडळाने आमदार डॉ. राहुल‎ आहेर यांना आमदार निधीतून विविध‎ विकास कामांचे निवेदनातून साकडे‎ घातले आहे. त्यांनी विकास कामांना‎ कामांना हिरवा कंदील दिला आहे.‎ श्रीरामपूर येथील प्रलंबित‎ विकासकामांना गती मिळावी, यासाठी‎ येथील ग्रामपंचायत सरपंच,‎ उपसरपंच, सदस्य यांनी आमदार डॉ.‎ आहेर यांची भेट घेऊन‎ विकासकामांची मागणी केली आहे.‎ कमानीचे बांधकाम, श्रीरामपूर ते‎ रामेश्वरराेडदरम्यान गावनदी, साखड‎ नाला, करला नाला, सिंद ओहळ या‎ ठिकाणी फरशी पुलांची मागणी व‎ दत्तमंदिर येथे सभामंडप बांधकाम‎ करण्याबाबत मागणी केली असून‎ त्यांनी कामांना हिरवा कंदील दर्शवला‎ आहे. बांधकाम विभागाला पाहणीचे‎ आदेश दिले असता त्यांनी तात्काळ‎ थळ पाहणी केली. यावेळी कि. वा.‎ निकम, प्रशांत निकम, संदीप निकम,‎ शरद निकम, दीपक पवार, नाना सावंत‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...