आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • MNS Chief Raj Thackeray 54 Birthday | Distribution Of Petrol At Cheaper Rate Of Rs. 54 In Nashik After Aurangabad; Fifteen Hundred Vehicle Owners Took Advantage

राज ठाकरेंचा वाढदिवस:औरंगाबाद पाठोपाठ नाशिकमध्येही 54 रुपये स्वस्त दराने पेट्रोल वाटप; पंधराशे वाहन धारकांनी घेतला लाभ

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यातर्फे तब्बल पंधराशे दुचाकी वाहनांना 54 रुपये सवलतीच्या दरात पेट्रोल देण्यात आले. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे यंदा ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी गर्दी करू नये असे आवाहन केले होते. त्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांनी नाशिकमध्ये राहूनच वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

सद्यस्थितीमध्ये महागाई गगनाला भिडली असून पेट्रोल व डिझेलचे दर देखील वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष दातीर यांनी ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त शहरवासीयांना पेट्रोलवर 54 रुपयांची सूट दिली. नवीन नाशिक विभागातील शिवांजली पेट्रोलियम, साई पेट्रोलियम, श्री सिद्धी पेट्रोलियम या पंपांवर तब्बल 1500 दुचाकी वाहनांना सवलतीचा लाभ देत पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.

प्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर समन्वयक सचिन भोसले, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष नितीन माळी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, श्याम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, जिल्हा चिटणीस अक्षय कोंबडे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा चिटणीस तुषार जगताप, शारिरीक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, ज्योती शिंदे, शाखा अध्यक्ष पंकज दातीर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...