आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआैद्याेगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी कायदा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, या कायद्याची सहजासहजी अंमलजबावणी केली जात नसल्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे. सातपूर आैद्याेगिक वसाहतीत उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच कार्यालय मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.
राज्यातील सुमारे ५२ एमआयडीसींपैकी सद्य स्थितीतील सुमारे २६ एमआयडीसीमध्ये किमान वेतन कायद्याचे पालन केले जात नाही. मालक वर्गाकडून हा कायदा सर्रासपणे पायदळी तुडवला जातो. या विरोधात आता मनसे रस्त्यावर उतरली असून त्याअनुषंगाने हे कार्यालय सुरू केले आहे.
येत्या १२ तारखेला शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील खालापूर एमआयडीसीत दुसरे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी सांगितले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी मनसे कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे मनसे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितले. मनसे कामगार सेनेच्या प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी योगेश शेवरे व सोपान शहाणे यांच्यावर साेपविण्यात आली.
यावेळी मनसे कामगार सेनेचे चिटणीस मनोज रामराजे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, हाजी अजगर शेख, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बंटी लभडे, नितीन माळी, वैभव महिरे, ज्ञानेश्वर बगडे, निशांत शेट्टी, विशाल भावले, विनोद यादव, चेतन खैरनार, मोहसीन शेख, जुनेद शेख, एजाज शेख, मीनानाथ नागरे, अमोल गवळी, राहुल सहाने, विनोद सिंग आदींसह मनसे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नाशिक बनले राजकीय पक्षांच्या युवानेत्यांचे केंद्र
सध्याचे फोडा फोडीचे राजकारण बघता सर्वच राजकीय पक्षाच्या दृष्टीने नाशिकला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच की काय सर्वच राजकीय पक्षांच्या युवानेत्यांनी नाशिककडे लक्ष केंद्र केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी नुकतीच नाशिकला भेट दिली होती. त्या पाठोपाठ दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकला भेट देत विविध विकास कामांचे उद्घाटन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.