आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोबाइल चोर टोळीस लासलगावात अटक ; संशयिताला आठवडी बाजारातून घेतले ताब्यात

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव पोलिसांच्या पथकाने रविवारच्या आठवडे बाजारातून मोबाइल चोरीप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. सूरजकुमार अर्जुन महातो (२४, महाराजपूर, ता. तालझरी, जि. साहेबगंज, झारखंड), कुणालकुमार महातो (१९) व इतर दोन अल्पवयीन साथीदारांवर लासलगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल चोरीच्या तपासासाठी सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रविवारी आठवडी बाजारातून एक संशयिताला ताब्यात घेतले. त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावातील आठवडे बाजारातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३. ३१ लाखांचे २४ मोबाइल हस्तगत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...