आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:गतिमंद मुलीसह दोन विवाहितांचा विनयभंग; एकाच दिवशी तीन घटना ; संशयितावर म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी तीन विनयभंगाचे प्रकार उघडकीस आले. याप्रकरणी संबंधित पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उपनगरला गतिमंद युवतीवर संशयिताने अत्याचार केला. पीडित गतिमंद युवतीच्या मावस बहिणीच्या तक्रारीनुसार, उपनगरला एका इमारतीत गतिमंद मावशीसोबत राहते. गुरुवारी सायंकाळी मावशी फ्लॅटमध्ये एकटी होती. सायंकाळी सातला त्या घरी आल्या. बेल वाजवली असता दरवाजा उघडण्यास उशीर झाला. तक्रारदार महिलेने फ्लॅटच्या गॅलरीमधून आत पाहिले असता एक तरुण गॅलरीत दिसला. संशयिताने बघून पळ काढला. गतिमंद मावशीने दरवाजा उघडल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत आडगाव परिसरात विवाहितेच्या पतीने संशयिताला तुमच्या नर्सरीमुळे आमचा रस्ता बंद झाला असा जाब िवचारला असता संशयिताने विवाहितेला विवस्त्र केले. याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत १८ वर्षांपूर्वीच्या प्रेमसंबंध असलेल्या प्रियकराने विवाहितेच्या पतीला व्हाॅट्सअॅपवर दोघांचे अश्लील फोटो पाठवत विवाहितेची बदनामी केली. यामुळे विवाहितेच्या मुलाचा साखरपुडा मोडला. संशयितावर म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...