आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये 'ती' असुरक्षित:शहरात एकाच दिवसांत दोन विवाहित महिलांचा विनयभंग; तर गतीमंद मुलीवर अत्याचार

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी एकाच दिवशी तीन विनयभंगाचे प्रकार उघडकीस आले आहेत. उपनगर परिसरात एका इमारतीमध्ये गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे अशी माहिती उघडकीस आली आहे. आडगाव परिसरात रस्ता बंद झाल्याने विवाहितेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.तर तिसऱ्या घटनेत विवाहितेच्या प्रियकराने पतीला दोघांचे 18 वर्षांपूर्वीचे फोटो पाठवत तिच्या मुलाचा होणारा साखरपुडा मोडल्याप्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत गतीमंद युवतीच्या मावस मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, उपनगर परिसरात एका इमारतीमध्ये गतिमंद मावशी सोबत राहतात. फिर्यादी या गुरुवार दि.16 रोजी सायंकाळी 5 वाजता मावशीला फ्लॅटमध्ये एकटी होती. सायंकाळी 7 वाजता त्या घरी आल्या. फ्लॅटची बेल वाजवली असता दरवाजा उघडण्यास उशिर झाला. तक्रारदार महिलेने फ्लॅटच्या गॅलरीमधून आत पाहिले असता एक तरुण फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभा असल्याचे निदर्शनास आले. संशयिताने बघून पळ काढला. गतीमंद मावशीने दरवाजा उघडल्यानंतर तीच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत आडगाव परिसरात राहणाऱ्या विवाहितेच्या पतीने संशयिताला तुमच्या नर्सरीमुळे आमचा रस्ता बंद झाला असा जाब िवचारला असतांना संशयिताने पतीला शिविगाळ केली. वाद सोडवण्यास पिडिती विवाहिता गेल्या असता संशयिताने विवाहितेला शिविगाळ करत तीचा गाऊन फाडून तीला विवस्त्र केले. महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली. आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत 18 वर्षापुर्वीच्या प्रेमसंबध असलेल्या प्रियकराने विवाहितेच्या पतीला व्हाटसअप ग्रुपवरुन नंबर मिळवत दोघांचे अश्लिल फोटो सोशलमिडियावर पाठवत विवाहितेची बदनामी केली. याप्रकराने विवाहितेच्या मुलाचा साखरपुडा देखील मोडला. संशयिताच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...