आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून अंदाज:जुलैत पावसाळा सुरू होण्याचा अंदाजधरूनच बियाणे, खत साठ्याची तयारी, कृषी विभागासमोर खरीपाचे आव्हान

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होणार असून पावसाचे प्रमाण कमी राहील, अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांत साशंकता निर्माण झाली आहे. हवामान विभाग दरवर्षी ३१ मे रोजी मान्सूनचा अंदाज जाहीर करतो. त्या वेळी काही बाबी स्पष्ट होणार आहेत. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार जूनमध्ये राज्यात मान्सून दाखल होणार असला तरी प्रत्यक्ष पावसाळा जुलैमध्येच सुरू होईल. त्यानुसारच बियाणे, खत साठ्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे.

महाराष्ट्रात खरिपात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका, तूर, मूग, उडीद, कापूस ही पिके घेतली जातात. यंदा एल निनोचे वर्ष असल्याने काही खासगी हवामान अभ्यासकांनी त्याचा पावसावर परिणाम होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर फिरलेल्या या संदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे, तर कृषी विभागानेही त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दरवर्षी सर्वसाधारण क्षेत्राच्या दहा टक्के अधिक क्षेत्र गृहीत धरून बियाणे, खते यांचे नियोजन केले जाते.

यंदाच्या खरीप हंगामाचे भवितव्य एल निनोच्या हाती
यंदा मान्सूनचे पाऊसमान सामान्य

भारतीय हवामान विभाग देशासाठी मान्सूनचा दोन टप्प्यांत अंदाज देतो, यामध्ये पहिल्या टप्प्यात पाऊसमानाच्या अंदाजानुुसार संपूर्ण देशात मान्सूनचे पाऊसमान सामान्य (सरासरी ८३.५ टक्के) राहण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील अंदाज येईल. भारतीय हवामान विभाग आणि इतर संस्थांच्या निरीक्षणानुसार मान्सून वेळेवर येण्याचे संकेत आहेत. १ जून रोजी मान्सून केरळमध्ये तर १० ते १२ जून दरम्यान राज्यात दाखल होण्याचा अंदाज आहे.

विभागनिहाय खरीप हंगामातील प्रत्यक्ष क्षेत्र, (क्षेत्र हे.) २०२२-२३
विभाग सर्वसाधारण प्रत्यक्ष

कोकण ४१६५०० ४१४५२७
नाशिक २१०१२२१ २०५५३०१
पुणे १०६५०४८ ११९६१०९
कोल्हापूर ७६३७५९ ७४६४५३
छत्रपती २०९०१९८ २०६७८९६
संभाजीनगर
लातूर २७६६९५४ २७६२४८८
अमरावती ३१७१७८५ ३१११५६४
नागपूर १९१२९५४ १९५५२६८
एकूण १४२८८४१८ १४३०९६०६

ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांना फटका बसण्याची शक्यता
गत पाच वर्षांपासून मान्सूनमधील पावसाची परिस्थिती बदलली असल्याचे दिसून येत आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला तरी खरा पावसाळा जुलै महिन्यात सुरू होईल. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होण्यास सुुरुवात होते, परंतु यामध्ये तूर, कापूस आणि बाजरी या पिकाला विलंब होत असतो. त्यामुळे शेतकरी धोका पत्करत पिके घेतात, परंतु पाऊस लांबला तर ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. - मोहन वाघ, विभागीय सहसंचालक, कृषी विभाग

संततधार असली तरी पोषक
यंदा एल निनोबाबत अंदाज पसरत आहे. तो अंदाज खरा ठरला तर खरिपावर परिणाम होऊ शकतो. मात्र एल निनोच्या वर्षात आणि सुरुवातीला संततधार झाली तरी पिकांना तो पोषक राहील, परंतु याबाबत हवामान विभागाच्या ३१ मेच्या अंदाजावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ