आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा अंदाज ढगातच!:महाराष्ट्रात तब्बल 53 टक्के कमी पाऊस, पूर्वमोसमी पाऊस सध्या खूपच कमी

नाशिक | सचिन वाघ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून सरासरीइतका राहणार आहे, तसेच गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र ठराविक ठिकाणे वगळता उर्वरित ठिकाणी ढगाळ तर बऱ्याच कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.

यंदा मान्सूनचे देशात आगमन हे नियमित वेळेच्या तीन ते चार दिवस आधी झाले. मात्र तरीही १ ते १४ जूनपर्यंत देशात मान्सून व मान्सूनपूर्वचे मान्सूनचा अंदाज ढगातच गेला आहे. पर्जन्यमान मिळून सरासरीच्या ३६ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ५३ टक्के कमी पाऊस पडला आहे.सुरुवातीला भारतीय हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट यांच्यात मान्सून दाखल होण्यावरून दावे-प्रतिदावे झाले.

आताही हवामान विभागाने महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्याचे सांगितले आहे, परंतु कोकण वगळता अन्यत्र मान्सूनचा पाऊस कोसळताना दिसत नाहीकृषी विभागाकडून खतांचा मागणीपेक्षा अधिक पुरवठाखरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे, खतांंचा मागणीपेक्षा अधिक पुरवठा केला आहे. मात्र शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात १० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला किंवा जमीन चांगली ओली झाली तरच पेरणी करावी, असे कृषी सहसंचालक विवेक सोनवणे यांनी सांगितले आहे.

लवकरच देश व्यापणार
तज्ज्ञांनुसार, मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि प. बंगालमध्ये कधीही प्रवेश करू शकतो. त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीत कोणताही अडसर आला नाही तर ३० जूनपर्यंत तो संपूर्ण देश व्यापू शकतो.

१ ते १४ जूनपर्यंत मराठवाड्यातील पर्जन्यमानाची स्थिती (मिलिमीटर) जिल्हा प्रत्यक्षात अपेक्षित टक्केवारी औरंगाबाद ३५.८ ५०.० (उणे) -२८ बीड ५४.४ ५६.३ - ३ हिंगोली १६.४ ५५.२ - ७० जालना १८.० ५१.७ - ६५ लातूर ३३.३ ६०.० - ४४ नांदेड ४५.३ ४८.२ - ६ उस्मानाबाद ४८.९ ६०.४ -१९ परभणी ५८.८ ५०.५ + १६ नगर ३३.२ ५१.० (उणे) ३५

महाराष्ट्रात प्रत्यक्षात पडला ३१.१ टक्के
१४ जूनपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ६६.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात फक्त ३१.१ मिलिमीटर पडला. म्हणजे सरासरीच्या ५३ % पाऊस कमी झाला.

काही राज्यांत गेल्या दोन दिवसांत तूट कमी झाली
राज्य- 14 जून - 11 जून
महाराष्ट्र -53% -67%
पंजाब-हरियाणा -98% -99%
राजस्थान -47% -99%
छत्तीसगड -85% -98%
मध्य प्रदेश -74% -97%
गुजरात -49% -97%
झारखंड -72% -68%

एमजेओ साखळीची मदत नाही
देशात मान्सून दाखल झाल्यापासून भारतीय सागरातून विषुववृत्तादरम्यान मार्गस्थ होणाऱ्या कमकुवत स्थितीतील एमजेओ( मँडन ज्युलियन ऑन्सिलेशन) साखळीची मान्सून ऊर्जितावस्थेसाठी कोणत्याही प्रकारे मदत झाली नाही. त्यामुळे देशभरातच पूर्वमोसमी पाऊस कमी झाला.

- माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग

बातम्या आणखी आहेत...