आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:मान्सून 48 तासांत बंगालच्या उपसागरात होणार दाखल; वर्धा, चंद्रपूर 46 अंशावर; महाबळेश्वरात गारवा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मान्सून चार दिवस अगोदरच दाखल होणार असून सध्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मान्सूनची प्रगती होत आहे. आगामी ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती, तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. विदर्भात सरासरी तापमानापेक्षा ३.५ ने कमाल तापमानात वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
वर्धा ४६.५, चंद्रपूर ४६.२, ब्रह्मपुरी ४५.४, नागपूर ४५.४, यवतमाळ ४५.०, अमरावती ४४.८, अकोला ४४.६, वाशिम ४३.५, गोंदिया ४३.८, परभणी ४३.४, जळगाव ४१.५, गडचिरोली ४१.४, औरंगाबाद ४१.२, बुलडाणा ४०.७,सोलापूर ४०.२ , उस्मानाबाद ३९.०, सातारा ३८.५, नाशिक ३६.४, सांगली ३५.४,कोल्हापूर ३३.५, रत्नागिरी ३३.४, मुंबई ३३.६, महाबळेश्वर २९.७.

बातम्या आणखी आहेत...