आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेटीच्या काेटी उड्डाणे घेणाऱ्या घंटागाडीचा नवीन ठेका तब्बल वर्षभरानंतर सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसात नियाेजीत 398 घंटागाड्यापैकी केवळ सरासरी 290 घंटागाड्याच रस्त्यावर फिरत आहे. एकीकडे ठेक्यात निश्चित केलेल्या घंटागाड्यापेक्षाही कमी वाहने असताना कचरा संकलन मात्र 750 मेट्रीक टनापर्यंत पाेहचले आहे.
त्यामुळे नवीन घंटागाड्याचा पायगुण म्हणून कचरा संकलन वाढले की, कागदाेपत्री कचरा वाढीव दाखवण्याचा प्रकार सुरू तर नाही ना अशीही शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपुर्ण क्षमतेने गाड्यांद्वारे कचरा संकलन सुरू असल्याचा दावा करीत लहान घंटागाड्या खत प्रकल्पावर जात नसल्यामुळे त्यांची संख्या दिसत नसल्याचा दावा केला आहे.
नवीन घंटागाडी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यांकडूनच काैतुक झाले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून अडचणीचा पाऊस पडत आहे. प्रामुख्याने, लहान वस्ती किंवा झाेपडपट्टी परिसर, गावठाणात लहान घंटागाड्या जाणे अपेक्षित असताना त्या चक्क बारा मीटर रूंदीपेक्षा माेठ्या रस्त्यांवर येत आहेत. दुसरी बाब म्हणजे, गाड्यांची कचरा साठवण्याची क्षमता व उंची डाेकेदुखी ठरली असून उंची अधिक असल्यामुळे अनेक महिलांना अक्षरश खुर्चीवर उभे राहून कचरा टाकावा लागत आहे.
यापुर्वी माेठ्या घंटागाड्यावर किमान दाेन कर्मचारी व एक चालक हाेता. लहान गाड्यांवर एक चालक व एक कर्मचारी असणे अपेक्षित असताना केवळ चालकाच्या भरवशावर गाड्या कचरा संकलीत असल्यामुळे नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. माेठ्या रस्त्यांवर लहान घंटागाड्या पाठवू नये तसेच कर्मचाऱ्यांनी कचरा संकलनासाठी पुढे यावे अशा सुचना केल्या हाेत्या.
गत आठ दिवसाचा आढावा घेतल्यानंतर 398 पैकी जेमतेम 290 घंटागाड्याच सरासरी येत असून उर्वरित गाड्या नेमक्या काेठे असा प्रश्न पडला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सर्व घंटागाड्या शहरात कचरा संकलन करीत असून त्यातील काही गाड्या जीपीएस ट्रॅकवर नसल्याचा दावा केला जात आहे.
पहिल्या दिवशी ठेका सुरू झाल्यानंतर जेमतेम 244 घंटागाड्याच कचरा संकलनासाठी धावल्या हाेत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 278, तिसऱ्या दिवशी, 249, तिसऱ्या दिवशी 302, चाैथ्या दिवशी 322, पाचव्या दिवशी 294, सहाव्या दिवशी 293 तर सातव्या दिवशी 303 घंटागाड्यांनी कचरा संकलन केले. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी 527 मेट्रीक टन इतका कचरा संकलीत झाला हाेता. मात्र आता हेच कचरा संकलनाचे दैनंदिन प्रमाण 777 मेट्रीक टनपार्यंत गेले आहे. त्यामुळे अचानक वाढीव कचरा काेठून आला असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.