आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • More Than 1000 Construction Blocks Will Be Broken In Hopes Of Getting Construction Permission At A Distance Of 10 Meters From The Military Boundary.

1 हजाराहून अधिक बांधकामाची काेंडी फुटणार:लष्करी हद्दीपासून 10 मीटर अंतराने बांधकाम परवानगी मिळण्याची आशा पल्लवित

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षण विभागाच्या हद्दीलगत शंभर ते पाचशे मीटर या अंतरावरील भुखंडांवर किती मजले आणि किती मीटर पर्यंत बांधकाम असावेत यावर असलेले निर्बंध उठण्याची आशा पल्लवित झाली असून दिल्लीतील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने लष्कर हद्दीपासून दहा मीटर अंतरानंतर संरक्षण खात्याच्या 2016 च्या परिपत्रकानुसार परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या नाशकात लष्करी हद्दीपासून शंभर मीटरपर्यंत बांधकाम परवानगी दिली जात असून त्यापुढे पाचशे मीटर अंतरावरील भुखंडावर स्टील्ट वगळता चार मजल्यांना किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे. 2016 मधील निर्णयात नाशिक महापालिका क्षेत्रातील लष्करी हद्दीचा समावेश नसल्यामुळे तुर्तास अडचण असली तरी, यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा झाल्यास दिलासा मिळू शकताे अशी प्रतिक्रिया नगररचना कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

देवळाली कॅम्प लष्कर कमांडरने दोन वर्षांपूर्वी पाठविलेल्या पत्रामुळे तत्कालिन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेल्या शंभर मीटर हद्दीपर्यंत प्लॉटधारकांना कोणतेही बांधकाम करता येणार नाही. तसेच शंभर पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या प्लॉटधारकांना चार मजल्यांपर्यंतच बांधकाम करता येईल असे आदेश काढले होते. यामध्ये स्टील्टचाही समावेश होता.

या निर्णयामुळे संरक्षण विभागाच्या लष्कर हद्दीलगतच्या शेकडो प्लॉटधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर खासदार हेमंत गाेडसे यांच्यासह भाजपाच्याही नेत्यांनी शंभर ते पाचशे मीटर पर्यंतच्या अंतरावरील भुखंडांवर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने एक आदेश जारी करत लष्कर हद्दीलगतच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील भुखंडावर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना परवानगी दिली आहे. मात्र लष्करी हद्दीपासून शंभर मीटर अंतरापर्यत काेणतेही बांधकाम करता येत नाही. जवळपास एक हजाराहून अधिक बांधकाम प्रकल्प, तसेच ले आऊटची प्रकरणे पडून असताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आशा निर्माण झाली आहे. त्यात 2016 मधील संरक्षण खात्याच्या आदेशानुसार लष्करी हद्दीपासून दहा मीटरनंतर बांधकाम परवानगी अनुज्ञेय केली आहे. मात्र, 2016 मधील आदेशात नाशिक शहराचा उल्लेख नसल्यामुळे हा नियम लागु करण्यासाठी पुन्हा केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

म्हणून नाशिक वगळले

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकचा समावेश 2018 मध्ये संरक्षण खात्याने काढलेल्या आदेशात आहे. मात्र उच्च न्यायालयात 2016 मधील नियमाचा संदर्भ घेत आदेश पारीत केले गेले. आता 2018 मधील आदेशाचा संदर्भ देत पाठपुरावा करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...