आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरात २० हून अधिक फूड ब्लॉगर; तरुणाईचा फूड ब्लॉगिंगकडे ओढा; फूडविक्रेत्यांनाही फायदा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिझिटल इंडियाकडे वाटचाल करताना तरुणाईचा कल सर्वाधिक सोशल मिडीयाकडे वाढू लागला आहे. याच सोशल मीडियाला व्यासपीठ बनवत तरुणाईला क्रेझ असलेल्या फूड ब्लॉगर्सकडून कुठले खाद्यपदार्थ कुठे चांगले मिळतात याची माहिती दिली जाते. खाद्यपदार्थांची मेकींग, त्या हॉटेल वा रेस्टॉरंटचे असलेले वातावरण, खाद्यपदार्थांची चव चाखल्यानंतर त्याबाबत ब्लॉगरकडून त्याबाबतचा आढावा घेत तो सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे पोस्ट केला जातो.

अनेकदा या सर्व गोष्टी सोशल मीडियावर लाइव्ह केल्या जात असल्याने अल्पावधीतच जगभरातील खाद्यप्रेमी त्याबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात. या फूड ब्लॉगर्सच्या एका व्हिडिओचे काही हजारोंमध्ये व्ह्यूज व शेअरिंग होत असल्याने शहराचे लोकल फूड देशासह जागतिक स्तरावर अल्पावधीत पोहचले आहे. याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे शहरात फूड ब्लॉगरची संख्यादेखील लक्षणीय असून त्याच्या फॉलोवर्सची संख्यादेखील रोज वाढत आहे.

विक्रेत्यांना मिळतो बुस्ट फुड ब्लॉगद्वारे खाद्यपदार्थ व ते तयार करण्याची पद्धत याबाबत व्हिडिओ पोस्ट केले जातात. हजारोंच्या संख्येत फॉलोवर्स असल्याने प्रसिद्धी मिळत असल्याने विक्रेते, व्यावसायिकांच्या व्यवसायाला देखील मोठा बुस्ट मिळतो. यामुळे व्यावसायिकाकडून फूड ब्लॉगर्सला खास आमंत्रित केले जाते. या फूड ब्लॉर्गसकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओ, रिव्ह्यूला साधारण महिनाभरात एक ते दहा लाख व्ह्यूस मिळतात.

बातम्या आणखी आहेत...