आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गंजमाळ येथील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलच्या मास्टर मॉलला लागलेली आग सोमवारी (दि. २०) सायंकाळपर्यंत देखील पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती. आग विझविण्यासाठी २४ तासांहून अधिक काळापर्यंत अग्निशामक दलाचे कर्मचारी परिश्रम घेतहोते. आग विझविण्यासाठी ३० पेक्षा जास्त बंब लागले असून ४० पेक्षा जास्त जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.
मात्र धूर जास्त असल्यामुळे तसेच जायला मार्ग नसल्यामुळे अडचणी येत आहेत. आगीत दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने रविवार असल्याने मॉल बंदहोता. यामुळे जीवितहानी झालीa नाही. श्याम आणी राजू मोटवानी अशी मॉलमालकाची नावे आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना शालिमार येथील गंजमाळ या भागात घडली होती.
मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्वरित अग्निशामक दल तसेच पोलिसांना संपर्क करून माहिती दिली होती. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले होते. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार आपल्या फौजफाट्यासह या ठिकाणी दाखल झाले होते. मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक केबल (वायर्स) भरल्या आहे. त्याचप्रमाणे इतर साहित्यदेखील खच्चून भरल्यामुळे आग आटोक्यात येत नाही. धूर प्रचंड प्रमाणात असल्यामुळे जवानांना आतमध्ये देखील जाता येत नव्हते.
यामुळे समोरच्या बाजूने एक व मागील बाजूने एक अशा दोन्ही बाजूने सतत दोन बंब पाण्याचा मारा करीत आहे. त्याचप्रमाणे धूर निघून जाण्यासाठी भिंतींना तातडीने मोठे दोनहोल पाडण्यात आले. तरीही आतमध्ये अनेक प्रकारचे कप्पे करण्यात आल्यामुळे व माल जास्त असल्यामुळे आतमधील धूर निघत नसल्यामुळे पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. मागील २४ तासांपासून लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहे. या प्रचंड धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून काहीजणांना तर थेट दवाखान्यात हलविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मागील बाजूला असलेल्या एका शाळेलादेखील सोमवारी सुटी देण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.