आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:विधी शाखेचे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी नापास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी कंबाईन पासींगचा निर्णय घेतला. पण नुकताच जाहीर झालेल्या एलएलबी शेवटच्या वर्षाच्या निकालात मात्र त्याची अंमलबजावणी केलीच नाही. यामुळे ५०० हून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत.

विद्यार्थ्यांना इंटरनल आणि एक्स्टर्नलचे गुण मिळविल्यास पासींगसाठी आवश्यक ४० गुण होत असतानाही विद्यापीठाने स्केल डाऊन केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू करत पास करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लाॅ, लॅन्ड लाॅ आणि कंपनी लाॅ यासह इतर विषयांचे विद्यार्थी नापास झाले.

गुण देण्याचा अधिकार महाविद्यालयांचा
स्केल डाऊन करण्याचा प्रश्न नाही. विद्यापीठाच्या अॅकडमिक काैन्सिलने विद्यार्थीहितासाठी कम्बाइन पासिंगचा निर्णय घेतला. पण तो नेमका काय तर लेखी परीक्षेतील सर्व उपघटकांचे गुण कम्बाइन करणे, प्रात्यक्षिकांतील उपघटक, माैखिक परीक्षेतील उपघटक यांचे गुण कम्बाइन करणे असा आहे. अंतर्गत गुण देण्याचा अधिकार महाविद्यालयांचा आहे.
डाॅ. महेश काकडे, परीक्षा नियंत्रक

अन्यथा आंदाेलन करू
विद्यापीठाने दिलेला शब्द पाळला नाही. स्केल डाऊन केले आहे. तसे न करता कम्बाइन पासिंगचा अवलंब करावा. अन्यथा आंदोलन करू.
अॅड. अजिंक्य गिते, विद्यार्थी प्रतिनिधी

बातम्या आणखी आहेत...