आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी व्यक्त:पाइपलाइन राेडवरील अर्धेअधिक पथदीप बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर राेडकडून सातपूर एमआयडीसीत जाणाऱ्या आणि झपाट्याने रहिवासी क्षेत्र विकसित झालेल्या पाइपलाइन राेडवरील अर्धेअधिक पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंदच आहेत. अनेक काॅलन्यांमध्येही रात्री यामुळे अंधार पसरलेला असताे.

काही ठिकाणी वाहनांचे पार्ट‌्स तसेच पेट्राेल चाेरीला जाण्याच्या घटना या अंधारात घडत आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. तर महापालिकेतील अधिकाऱ्यांना फाेन करूनही काही उपयाेग हाेत नसल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...