आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास:मोरेदादा हॉस्पिटल जगभरातील गरजू रुग्णांना आधार ठरणार; भूमिपूजनवेळी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरेंचा विश्वास

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल देशासह जगभरातील गरजू रुग्णांना आधार ठरेल आणि भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वरनजीक सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटलचे भूमिपूजन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व नितीन मोरे यांचे हस्ते विधिवत, मंत्रघोषात झाले. कार्यक्रमास मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, आयकर उपायुक्त विशाल माकवाना, माहिती प्रसारण जेष्ठ अधिकारी अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. एक वर्षाच्या आत हॉस्पिटलचा काही भाग उभा करून तो रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देत टप्प्याटप्प्यात हे भव्यदिव्य रुग्णसेवेचे मंदीर जगभरातील गोर, गरीब, गरजू रुग्णांसाठी खुले होईल, अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली.

बातम्या आणखी आहेत...