आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची प्रभातफेरी:अमृत महोत्सवानिमित्त १२ ऑगस्टला ५००० विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा विभागामार्फत शिक्षण विभागातर्फे शहरातील खासगी शाळांमधील ५००० विद्यार्थ्यांची १२ आॅगस्टला प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. याचे नियाेजन करताना तीन विभागांतील शाळांमधून वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांना पायी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आणण्याची जबाबदारी शाळांना दिली असली तरी समाराेपानंतर विद्यार्थ्यांना परत कसे पाठवायचे? हा प्रश्न विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनासमाेर उभा राहणार आहे.

ही फेरी सकाळी ७.३० वाजता शहराच्या विविध भागांतून काढण्याचे नियाेजन आहेे. कान्हेरे मैदान (गाेल्फ क्लब) येथे ११.३० वाजता कार्यक्रमाची सांगता हाेईल. प्रत्येक शाळांमधून १०० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या नियाेजनासंदर्भात, शुक्रवारी (दि. ५) दुपारी ३ वा. राजीव गांधी भवन येथे बैठक हाेणार आहे.

फेरीबाबत हे प्रश्न मात्र अनुत्तरीत

विद्यार्थी ४ ते ५ किमीपर्यंत पायी फिरतील त्यांना पाणी, खाऊ मिळणार का?
सकाळी ७.३० ची वेळ असली तरी अर्धा तास अगाेदर ७ वाजताच घरातून निघावे लागेल. समाराेप ११.३० वाजता हाेईल. यावरून पाच तास विद्यार्थी ताटकळत ठेवायचे का?
विद्यार्थी शाळेपर्यंत येतीलही मात्र, समाराेपानंतर त्यांना घरी अथवा शाळेपर्यंत नेण्याची जबाबदारी काेणाची?
१२ आॅगस्ट (शुक्रवार) हा दिवस शासकीय, खासगी कार्यालयांच्या कामाचा दिवस असल्याने या फेरीच्या मार्गावर व समाराेपानंतर एकाचवेळी माेठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आल्याने वाहतूक काेंडी हाेण्याची शक्यता असल्याने त्याचे नियाेजन काय?

पंचवटी, द्वारका, मुंबईनाका येथून सुरू झालेल्या फेरीचा मार्ग असा
यामध्ये पंचवटीतील आर. पी. विद्यालय, ए. पी. पी. माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे एकत्रित विद्यार्थी निमाणी श्रीराम विद्यालय येथे जमा हाेतील. तिथून ते पंचवटी कारंजावरून कान्हेरे मैदानावर येतील. न्यू इरा स्कूल व रमाबाई आंबेडकर स्कूलचे विद्यार्थी मुंबईनाक्यावर जमा हाेऊन तिथून तर द्वारका भागातील एम. एस. काेठारी हायस्कूल येथे या शाळेसह रवींद्रनाथ विद्यालय, रंगूबाई जुन्नरे विद्यालय, यूज नॅशनल हायस्कूल, सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी एकत्रित हाेऊन फेरी काढतील.

बातम्या आणखी आहेत...