आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील धक्कादायक घटना:ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष देत नव्हता साडे तीन वर्षांचा चिमुकला, आईने तोंड दाबून केली हत्या मग स्वतःला देखील संपविले

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये एका आईने आपल्याच साडे तीन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण फक्त एवढेच होते, की तो चिमुकला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देत नव्हता. याच रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली.

नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाथर्डी फाट्याजवळ असलेल्या साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास शिखा सागर पाठक (30) हिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिने एक सुसाईड नोट देखील सोडले होते. त्यामध्ये या दोन्ही मृत्यूंसाठी इतर कुणालाही जबाबदार धरू नये असे तिने सांगितले होते.

शिखा सागर पाठक आपल्या पती आणि तीन वर्षीय मुलगा रिधान सागर पाठक यांच्यासोबत राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी ती बेडरुममध्ये आपल्या मुलाला ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देण्यास सांगत होती. बेडरूमचा दार आतून बंद केला होता. महिलेने सुरुवातीला मुलाचे तोंड उशीने दाबून त्याचा खून केला. यानंतर काही वेळाने तिने बेडरूममध्येच गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले.

महिलेने सुसाइड नोटमध्ये आपणच मुलाची हत्या केली हे स्पष्ट केले नाही. दोघांचे मृतदेह आतून बंद असलेल्या खोलीतच सापडले. तसेच मुलाच्या नाकातून रक्त आले होते. संबंधित महिलेच्या आई-वडिलांनी सुद्धा ही हत्या तिनेच केली असे पोलिसांना सांगितले आहे.

महिलेवर सुरू होते मानसोपचार
मयत महिला मानसिक आजारावर उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन वर्षांच्या चिमुकल्याकडून ऑनलाइन शिक्षणाची तिने अपेक्षा ठेवली. मुलास काही येत नसल्याने या रागातून महिलेने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी दिली. या प्रकरणी हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...