आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:मुलीचा ताबा मिळावा यासाठी आईचे उपोषण ; मुलीसह घरातून हाकलून दिले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे देण्याचे निर्देश दिले असतानाही पती दोन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन गेला. आता पती व त्याचे कुटुंबीय मुलीसह फरार असल्याने आपण मुलीला गेल्या सहा महिन्यांपासून बघितलेही नाही. मुलीचा ताबा आपल्याला मिळावा या मागणीसाठी एक माता जिल्हाधिकारी कार्यालयासामोर उपोषणाला बसली आहे. पैशांची मागणी करत त्यांनी माझ्या मुलीसह मला त्यांच्या राहत्या घरातून हाकलून दिले. त्यानंतर मुलगी राही हीला पतीने जबरदस्तीने नेले. मुलीचा तात्पुरता ताबा मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालय शहादा येथे अर्ज केला. न्यायालयाने मुलीचा ताबा माझ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिल्याचे या महिलेने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...