आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्वत, गडकिल्ले ही आपली संस्कृती आहे. पर्वतांनी आपल्याला भाषा, संस्कृती, इतिहास दिला. पर्वत हे आपले रक्षणकर्ता आहे. परंतु, आता पर्वतांचे रक्षण करणे, संवर्धन करणे, पर्वतांचे निसर्गसौंदर्य जपणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी केले.सी.एच.एम.इ सोसायटी संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम येथे जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हिमालय, अरवली, सह्याद्री पर्वत यातील उंच शिखर पर्वतरांगा, नद्या, यातील पशु-पक्षी, जैवविविधता, खनिजसाठा याबद्दल माहिती सांगितली.
जगातील पर्वतरांगा, भारतातील पर्वतरांगांसोबतच नाशिक येथील पर्वतरांगांची माहिती अधोरेखित करत निसर्गसौंदर्य अनुभवत ते जतन करण्याचा संदेश दिला. मीनल जाधव लिखित व दिग्दर्शित ‘पर्वतांचे महत्त्व’ हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. यानंतर पर्वतांचे संरक्षण करण्याची शपथ श्रीमती विणा मुठाळ यांच्या मार्गदर्शनाने सर्व उपस्थितांनी घेतली. या जागतिक पर्वत दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पर्वत, पर्वतरांगा, नद्या यांच्या लक्षवेधी प्रतिकृती, तक्ते तयार करत भौगोलिक प्रदर्शन भरविले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलथे यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. प्रस्तावना अश्विनी कापडणीस यांनी केली. मुख्याध्यापिका शुभांगी वांगीकर यांनी आभार मानले. यावेळी प्रशांत पाटील, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष धनंजय निचळ, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.