आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडाळागावानजीकच्या ‘जेएमसीटी’ इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने यंदाच्या शैक्षाणिक वर्षात सहा हजार रुपये शुल्कवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त पालक थेट रस्त्यावरच उतरले. तीन तास रास्ता रोकौ करून पालकांनी शुल्कवाढीस विरोध केला. त्यामुळे आता शाळा प्रशासनाने १० जूनपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. शाळेकडून शनिवारी (दि. ४) आयोजित पालक-शिक्षक बैठकीत शुल्कवाढ व कोरोनाकाळातील शुल्कावरून वादाला सुरुवात झाली. यावर तोडगा निघणार नसल्याचे मुख्याध्यापिका घस्ते यांनी सांगितल्याने पालकांनी आंदोलनाचे अस्त्र उपसल्याने सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळा आवारात अन् बाहेर गोंधळ सुरू होता. कोरोनाकाळात शाळा ऑनलाइन सुरू होती. त्यावेळचे शुल्क पूर्णपणे मागितले जात असल्याने शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी ‘जेएमसीटी’ इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. चित्रा घस्ते यांनी अमान्य केल्याने पालक संतप्त झाले. शाळेच्या आवारातून सुरू झालेले आंदोलन रस्त्यावरच आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
शिक्षकांची पालकांना भावनिक साद शेकडो पालकांनी शुल्क वाढ करू नये असे लेखी पत्रही दिले. ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज हिसामोद्दीन साहब खतीब, ट्रस्टी हाजी रऊफ पटेल, अहेसान खतीब, शेखन खतीब यांनी पालकांशी चर्चा केली. आमचे पगार शाळेच्या फीवरच अवलंबून असतात. त्यामुळे आंदाेलन मागे घ्यावे, अशी भावनिक साद यावेळी उपस्थित शिक्षिकांनी घातली.
५० टक्केच फी आकारणार... ^पालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठीच आम्ही पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन केले होते. यात कोरोनाकाळातील दोन वर्षांचे शुल्क माफ करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आम्ही ५० टक्के शुल्क कमी करत आहोत. आता यासंदर्भात १० जूनला निर्णय घेतला जाणार आहे. - हाफिज हिसामोद्दीन साहब खतीब, अध्यक्ष, जेएमसीटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.