आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यापालांच्या वक्तव्याचा अनोखा निषेध:पाचशे पोष्टकार्ड पाठवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन; कोश्यारी विरोधात घोषणाबाजी

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महापुरुष आणि महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत वादग्रस्त विधान करुन महाराष्ट्राचा अपमान करत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक तालुक्याच्या वतीने पाचशे पोष्टकार्ड पाठवित निषेध केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिकरोड येथील टपाल कार्यालयाबाहेर नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना पाचशे पत्र पाठवत निषेध करण्यात आला. यावेळी पदाधिकारी यांनी चलेजाव चलेजाव राज्यपाल चलेजाव, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध, वाजवा तुतारी, हटवा कोश्यारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, विनायक कांडेकर, ऋषिकेश पिंगळे, कुंदन ढिकले,शानु निकम, निल पेखले, आकाश पिंगळे, निखिल भागवत,नंदू चव्हाण, सोनू वायकर,अनिल वायकांडे, कुमार गायधनी, मोहनिश मुन्ना दोंदे, प्रितेश भदाणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...