आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायर ऑडिट न केल्यामुळे अंतिम नोटीस:शहरातील 78 हॉस्पिटलचा वीज -  पाणीपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक ठिकाणी हॉस्पिटलला आग लागून झालेल्या दुर्घटनेत शेकडो रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची उदाहरणे ताजी असताना वर्तमानपत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष नोटीस दिल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या 78 हॉस्पिटल विरोधात पहिल्या टप्प्यात आता महापालिकेने वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंधरा दिवसांची नोटीस पूर्ण झालेल्या रुग्णालयांना सात दिवसाचे अंतिम नोटीस देऊन फायर ऑडिट सादर करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. त्या मुदतीत अहवाल न देणाऱ्या हॉस्पिटलचा प्रथम पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून महावितरणाकडे वीज पुरवठा खंडित करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे.

कोरोना कालावधीमध्ये नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल थाटण्यात आले. त्यावेळी केवळ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व आवश्‍यक उपचार सामग्री याकडेच लक्ष दिले जात होते. वैद्यकीय विभागाने देखील अरुंद जागेमध्ये तयार केलेले रुग्णालय तसेच नियम डावलून तयार केलेल्या दवाखान्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता महापालिकेने प्रत्येक रुग्णालयांकडून फायर ऑडिट दाखला बंधनकारक केला आहे.

मागील काही वर्षात मुंबई, ठाणे, पुणे तसेच नगर येथील काही खासगी आणि शासकीय रूग्णालयांना आग लागून दुर्घटना घडल्या होत्या तसेच मोठा मोठ्या हॉटल्स देखील आग लागून जीवित्तहानी झाली होती. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाने रहिवाशी, व्यावसायिक तसेच हॉस्पिटलचे फायर आॉडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून फायर ऑडिट पाठवा अन्यथा कारवाई करू एवढ्यापुरताच प्रक्रिया करणाऱ्या महापालिकेला गाढ झोपेतून जाग आली होती. त्यानंतर महापालिकेने 15 मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या व्यावसायिक, रहिवाशी आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाने फायर आॉडीट करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये आवाहन केले.

त्यानंतर शहरातील 607 हॉस्पिटल पैकी 388 हॉस्पिटल्सने फायर आॉडीट केल्याचे समोर आल्यामुळे त्यांना वगळून उर्वरित 219 हॉस्पिटलला पंधरा दिवसांची नोटीस द्वारे मुदत दिली. मात्र यातील जेमतेम अकरा हॉस्पिटलने फायर ऑडिट केल्याचा दाखला दिला असून आता उर्वरित 208 हॉस्पिटलवर टप्या टप्प्याने कारवाई केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 78 हॉस्पिटलला सात दिवस मुदत असलेली अंतिम नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांनी फायर आॉडीट न केल्यास त्यांचा प्रथम पाणी पुरवठा खंडित केला जाणार असून त्यानंतर महावितरणच्या मदतीने वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...