आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर खासदार हेमंत गोडसे यांना मच्छरची उपमा देवून टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर खासदार गोडसे यांनी देखील एक मच्छर आदमी को..., अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आमच्याच शिवसेनेचा महापौर बसणार असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेचे 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, त्यांच्यापाठोपाठ रविवारी हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शिंदे सेनेत प्रवेश केला.यावेळी मंत्री, खासदार, आमदार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे विचार आणि हिदुंत्व यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहे. आता माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांची संख्या ही बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये वाढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकत आहे. आगामी काळात देखील नाशिक महापालिकेवरच आमच्या शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. आम्हाला मच्छरांची उपमा दिली, मात्र आम्ही छत्रपतींचे मावळे असून तसेच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहे. त्यामुळे एकर मच्छरमुळे डेंगू, मलेरिया, प्लेटलेट कमी होतात हे राऊत यांना माहित नसावे असा उपरोधिक टोला देखील गोडसे यांनी लगावला. यावेळी अजय बोरस्ते, राजु लवटे, शाम खोले, रमेश धोंगडे,शिवाजी भोर यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो, जय भवानी जय शिवाजी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा विविध घोषणाबाजी करीत उद्धव ठाकरे गटाला आव्हान करीत असल्याचे दाखवून दिले
प्रवेशासाठी महिलांची गर्दी
शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती, तसेच महिला कार्यकर्त्यां देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या आवाजात शिंदे गटात प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.