आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्करी हद्दीपासून आता फक्त पन्नास मिटर अंतराचा भूखंड सोडून उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाटधारकांना बांधकाम करता येणार आहे.संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कल हद्दीलगतच्या हजारो शंभर मिटरच्या आतील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लष्कर हद्दीलगच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरातील भूखंडावरील बांधकामाचा विषय मार्गी लागल्याच्या पाठोपाठ आता संरक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
देवळाली लष्कर कमांडरने तिन वर्षांपूर्वी दिलेल्या पत्रान्वये तत्कालिन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेल्या शंभर मीटर हद्दीपर्यंत प्लॉटधारकांना कोणतेही बांधकाम करता येणार नाही.तसेच शंभर पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या प्लॉटधारकांना चार मजल्यांपर्यंतच बांधकाम करता येईल असे आदेश काढले होते.या निर्णयामुळे संरक्षण विभागाच्या लष्कर हद्दीलगतच्या शेकडो प्लॉटधारकांमध्ये असंतोषा निर्माण झाले होता.याची दखल घेत लष्कर कमांडरचा निर्णय बदलण्यासाठी खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. गोडसे यांच्या या सततच्या पाठपुराव्यातून लष्कर हद्दीलगतच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील भुखंडावर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना वर्षभरापूर्वी परवानगी मिळाली होती.
असे असले तरी लष्कर हद्दीपासून लगतच्या शंभर मिटरपर्यतच्या भूखंडबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित होता. शंभर मिटरपर्यतच्या अंतरावरील भूखंडवर बांधकाम करण्याची परवानगी द्यावी यासाठी गेल्या वर्षभरात खासदार हेमंत गोडसे यांनी अनेकदा दिल्लीत जात संरक्षण मंत्राकडे सततचा पाठपुरावा केला होता. गोडसे यांच्या स्वतःच्या पाठपुराव्याला आज मोठी यश आले आहे. लष्कर हद्दीपासून 100 मीटर अंतराच्या आतील भूखंडावर बांधकामाची अट काहीशी शिथिल करण्यात आली असून यापुढे फक्त पन्नास मीटरचे अंतर सोडावे लागणार आहे.उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाटधारकांना बांधकाम करता येणार आहे.संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कल हद्दीलगतच्या हजारो शंभर मिटरच्या आतील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.