आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुशिक्षित बेरोजगारांना तसेच महाविद्यालयीन पदवीधर आणि पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी येत्या चार डिसेंबर रोजी शहरात खासदार रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्यात विविध ठिकाणच्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित असणार आहेत. विविध नामवंत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.
मेळाव्यात पाचवीपासून पदवीधर आणि पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण झालेले झालेले विद्यार्थी तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना भाग घेता येणार आहे. हा मेळावा येत्या चार डिसेंबर रोजी पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स होणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अनुभवाची अशी कोणतीही अट नसणार आहे.
मेळाव्यास जिल्ह्यातील अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांनी यावेत यासाठी शाळा,महाविद्यालय,एसटी स्टँड तसेच गावपातळीवरील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आलेली आहे. .भक्ती अजिक्य गोडसे यांच्या संकल्पनेतून मेळाव्याचे दिवसभर नियोजन करण्यात आलेले आहे. या संदर्भात उमेदवाराकडून कोणतीही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही.उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या मेळाव्यात विविध ठिकाणच्या नामवंत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ते उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहेत.या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो गरजूंना आणि सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील गरजू आणि सुशिक्षित बेरोजगारांनी https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 या लिंकवर ऑनलाईन आपल्या अर्जाची नोंदणी करून मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.