आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेराेजगार तरुणांना राेजगाराची संधी:शहरात रविवारी खासदार रोजगार मेळावा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशिक्षित बेरोजगारांना तसेच महाविद्यालयीन पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी शहरात खासदार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे उपस्थित असतील. नामवंत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्तिपत्र देण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

पाचवीपासून पदवीधर आणि पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच सुशिक्षित बेरोजगारांना मेळाव्यात भाग घेता येणार आहे. पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अनुभवाची कोणतीही अट नाही. जिल्ह्यातील अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांनी सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. उमेदवाराकडून कोणतेही शुल्क याकरिता आकारण्यात आलेले नाही.

उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो गरजूंना आणि सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. तरी जिल्ह्यातील गरजू आणि सुशिक्षित बेरोजगारांनी https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 या लिंकवर ऑनलाइन आपल्या अर्जाची नोंदणी करून मेळाव्यास उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...