आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२:एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा ८ ऑक्टाेबरला; राज्य शासनाच्या विविध ८०० पदांची भरती होणार

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण ८०० पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२२ ही येत्या ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या पदांची भरती एक चांगली संधी असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच नियोजनबद्ध अभ्यास केल्यास परीक्षेत नक्की चांगले यश मिळू शकेल.

एमपीएससीतर्फे ८०० पदांच्या भरतीप्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, गट-ब या संवर्गातील ४२ पदांची भरती होईल. तर वित्त विभागांतर्गत राज्य कर निरीक्षक ७७ पदे, गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ६०३ पदे, महसूल व वनविभागांतर्गत दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक ७८ पदे असे एकूण ८०० पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे, दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक हे पद पहिल्यांदा एमपीएससीद्वारे भरले जात आहे. पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर २०२२ नंतर होईल.एमपीएससीतर्फे घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा १०० गुणांसाठी तर मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी होईल. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी १०० गुण व मुलाखत ४० गुण याप्रमाणे होईल.

बातम्या आणखी आहेत...