आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस यांची टोलेबाजी:पवार साहेबांच्या सल्ल्यांची खरी गरज श्रीमान ठाकरेंना : फडणवीस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी राज्याचे प्रश्न सोडविण्याबाबत शरद पवारांनी लक्ष दिले तर चांगले होईल. पवार साहेबाच्या बहुमूल्य सल्ल्यांची श्रीमान उद्धव ठाकरेंना जास्त गरज असल्याचा टाेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवंेद्र फडणवीस यांनी लगावला.

एका खासगी पुरस्कार सोहळ्यानिमित्त मंगळवारी फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणलो की, राज्य सरकारकडून राज ठाकरेंनी अपेक्षाच ठेवू नये. ते राज्य सरकारबाबत इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील, असे वाटलेही नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हे लांगूलचालन करतंय. या सरकारने सर्व मर्यादा सोडल्या आहेत. आम्ही राज्य सरकारविरोधात लढत आहोत, राज ठाकरेंनीही त्यांच्या विरोधात लढले पाहिजे. हनुमान चालिसा म्हणण्याची घाेषणा केल्यानंतर हे सरकार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत खासदार, आमदाराला १२ दिवस जेलमध्ये टाकतात. दुसरीकडे, मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय सुरू केले तर घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पाॅवरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम राज्यावर होणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मात्र महाराष्ट्रावर परिणाम होईल. महाविकास आघाडीत असलेल्या मंत्र्यांचे वर्क फाॅर्म जेल सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीराजेंनी सदिच्छा भेट घेतली असून त्यांच्या सोबत आमची चांगली मैत्री आहे, असेही त्यांनी सांगितले.

अयोध्येत जाणाऱ्यास रोखू नये
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंग यांचा विरोधाबाबत माहिती नाही. मात्र, रामाच्या शरणात जाे जात असेल, त्याला जाऊ दिले पाहिजे. रामाच्या शरणात जाण्यापासून कुणालाही रोखण्याचे काही कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...