आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षणाक्षणाला पुढे जाण्यासाठी लागलेली धडपड.... जंप्स व टेबल टॉपवरुन उंच झेप घेणाऱ्या रेसिंग बाईक... विदेशातून खास आलेल्या रायडर्सचे डोळे फेडणारे प्रात्यक्षिके अन् प्रेक्षकांची त्यास मिळणारी टाळ्या व शिट्ट्यांची दाद अशा रोमहर्षक वातावरणात शहरात एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार नाशिककरांनी अनुवभला.
अटीतटीच्या या स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या लढतील टीवीएस रेसिंग टीमचा सीडी जिनानने विजेतेपदावर आपले नाव कोरले. एम आर एफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत शहरातील पेठेनगर येथील पेठे इस्टेट येथे रविवारी (दि.१) आयोजन करण्यात आले होते. एसएक्स १ या विदेशी व देशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटाची स्पर्धा पाहण्यासाठी दुपारपासून मोठ्या संख्येने गर्दी केली होती. स्प
र्धेसाठी सुपरक्रॉस हा कृत्रिमरीत्या बनवलेल्या मार्गावर १२ जंप्स, १ टेबलटॉप व १ कट टेबलटॉप साकारण्यात आले हाेते. या ट्रॅकवर वेगाने जाणाऱ्यांसाठी बाईक रायडर्सचे कसब पणाला लागले होती. प्रारंभापासून रंगलेल्या स्पर्धेत प्रेक्षकांना नेत्रदीपक स्पर्धेचा थरार बघायला मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.