आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणकडून पावसाळापूर्वीची डीपीची कामे केली जातात. मात्र, यंदा महावितरणकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. पथदीपांच्या इलेक्ट्रिक सर्किट बॉक्सची झाकणे तुटलेली, त्यातील बाहेर डोकावणारे वायरिंग, लोंबणाऱ्या वायरी, कित्येक डीपींची झाकणेही उघडीच असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
महावितरण कंपनीकडून लावण्यात आलेल्या डीपीचे दार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत आहे. काही डीपी घराशेजारी, मैदानालगत आहे. याकडे मावितरण कपंनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते.
शहरातील जुने नाशिक मधील फुले मार्केट परिसरात, पखालरोड, नागजी चौक, वडाळारोड भागातील रस्त्यांवरील पथदीपांचे इलेक्ट्रीक सर्किट बॉक्स उघडे पडलेले आहेत. त्यामुळे त्यातील वायरिंगही बाहेर पडले आहे. कित्येक ठिकाणी तर या वायरी खाली लोंबकळत असल्याचेही दिसून येत आहे. तसेच, महावितरणनेही ठिकठिकाणी डीपी व मिनी डीपींची व्यवस्था केलेली आहे. त्यातील बऱ्याचशा डीपींची झाकणे गायब असल्याने त्या उघड्याच आहेत. याकडेही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
डीपींची दुरुस्ती करा
डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होत असतो. मात्र, तरी शहरातील अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नाही. याठिकाणी लहान मुलांसह जनावर फिरत असतात. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे, असे रहिवासी ऐजाज मकरानीने म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.