आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अशी ही चिखलफेक':संगीताच्या तालावर थिरकत 1000 नागरिकांनी चिखल फासत लुटला आनंद, काय आहे मडबाथ उत्सव? जाणून घ्या

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये संगीताच्या तालावर थिकरत तब्बल 1000 हुन अधिक नागरिकांनी माेठ्या उत्साहात मडबाथचा आनंद लुटला. चांमरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे यंदाही मडबाथचे (माती स्नानाचा) आज आयाेजन करण्यात आले हाेते.

काय आहे मडबाथ उत्सव?

राजकारणात या नेत्याने त्या नेत्यावर चिखलफेक केली असे आपण अनेकदा ऐकतो. चिखलफेक करणे हा वाक्प्रचार म्हणून रुढ असला तरी असा खरंच उत्सवही असतो. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या या उत्सवात हजारोंच्या संख्येने लोकांनी संगीताच्या तालावर थिरकत एकमेकांच्या अंगावर चिखलफेक केली.

विशेष म्हणजे, या उत्सवात आधी प्रत्येकाला वैयक्तिकरित्या चिखल फासत असत पण यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता. या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते.नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.

उत्साह दांडगा

या वर्षीसुद्धा लोकांचा उत्साह दांडगा दिसला. मुंबई,पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि शहरातील 1000 लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. हनुमानजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

या मडबाथमध्ये माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल,प्रदीप पाटील,योगेश कमोद, किशोर बेलसरे, एड.धर्मेंद्र चव्हाण डॉ.ज्ञानेश्वर चोपडे,वैभव शेटे, आदी ग्रुपच्या सदस्यांचा समावेश होता. पंढरपूरहून आलेले सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यही यात सहभागी झाले होते. मडबाथनंतर मिसळपार्टीचाही सर्वांनी आनंद लुटला.

चिखलाने आंघोळ करण्यामागचे कारण?

महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते.वारुळाची माती गोळा केली जाते.आठ दिवस आधी ती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ती लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते,असे नंदू देसाई यांनी सांगितले.