आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप व्यक्त:सिडकोत दाेन दिवसांपासून गढूळ पाणी

सिडकाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील राजरत्ननगरसह उत्तमनगर भागात दाेन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आधीच साथीच्या आजारांनी नागरिक हैराण असताना आता प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सिडकोतील जुन्या प्रभाग क्रमांकानुसार २४, २५, २७, २८, २९, ३१ यातील बहुतेक प्रभागात दररोज पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. कधी कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी वेळीअवेळी पाणीपुरवठा तर कधी दूषित तर कधी गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. आठवडाभरापासून प्रभाग २९ मधील राजरत्ननगर, उत्तमनगर भागात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवाळीच्या कामगारांना सुट्या संपल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना सुट्या कायम असल्याने मुलांचेही या पाण्याने आराेग्य धाेक्यात आले आहे. गढूळ पाण्याच्या समस्येमुळे थंडी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आजारांची साथ पसरली. डॉक्टर नागरिकांना चांगले व स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला देत असताना नळाला मात्र गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आजार थांबणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष
ऑनलाइन तक्रार करूनही दूषित पाणीपुरवठा सुरूच असून मनपा प्रशासनाकडे विचारणा केली असता या ठिकाणी पाइपलाइन टाकावी लागेल.बांधकाम विभागाकडे रस्ता खोदण्याची परवानगी मागितली असून ती मिळाल्यानंतर जलवाहिनी टाकली जाईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत हाेईल. ताेपर्यंत टँकरने पुरवठा हाेईल असे सांगण्यात आले.- देवेंद्र पाटील, सामजिक कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...