आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात गढूळ पाणीपुरवठा:सिडकोतील राजरत्न नगर भागात नागरिक त्रस्त; तक्रार करुनही दखल नाही

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील विविध भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच साथीच्या आजारांनी नागरिक हैराण असताना आता प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

सिडकोच्या जुन्या प्रभाग क्रमांकानुसार 24, 25, 27, 28, 29,31 असा प्रभाग येतो. यातील बहुतेक प्रभागात दररोज पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. कधी कमी दाबाने पाणी पुरवठा, कधी वेळी यावेळी पाणी पुरवठा तर कधी दूषित तर कधी गढूळ पाणी पुरवठा सुरू आहे. आठवडा भरापासून प्रभाग 29 मधील राजरत्न नगर, उत्तम नगर भागात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सिडको परिसरातील तब्बल चार दिवसांपासून व्हिडिओ पाहण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने मग वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येला फटका बसत आहे. रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी करू नये त्याची दखल घेतली जात नसल्याने आक्रमण आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आले आहेत आणि सणासुदीचा का संपत नाही तोच औषध पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने तातडीने नसत पाणीपुरवठा बाबत दाखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

साथीचे आजार

त्यात गढूळ पाण्याची समस्या - सिडको भागात थंडी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आजाराची साथ पसरली आहे. डॉक्टर नागरिकांना चांगले व स्वच्छ पाणी पिण्याची सल्ला देत असताना. नळाला मात्र गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आजार थांबणार कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तक्रारींचे निवारण नाही झाले

सामजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील म्हणाले की,​​​ऑनलाइन तक्रार करूनही दूषित पाणीपुरवठा न थांबला नाही. मनपाने उत्तर देताना सांगितले आहे की, याठिकाणी नव्याने चार इंची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. यासाठी बांधकाम विभागाकडे रस्ता खोदण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळतात पाईपलाईन टाकली जाणार असून तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. - ,

बातम्या आणखी आहेत...