आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाने नियोजन:मुकणेत अतिरिक्त तीन टीएमसी पाणी येणार; नाशिक, नगरची तहान भागणार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर आलेला ताण कमी करण्याचे शासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी ऊर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर नाशिक व नगरची तहान भागणार असून संबधित प्रस्ताव मान्यतेसाठी जलसंपदा विभागाने शासनाला सादर केल्याचे समजते.

नाशिकची लोकसंख्या २० लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. शिवाय गंगापूर धरणातून नाशिक शहरासह निफाड, येवला, वैजापूरमार्गे औरंगाबाद व पुढे मराठवाड्याकडे पाणी जाते. गंगापूर धरण हे जुने झाले असून वाढत्या गाळामुळे साठवणूक क्षमताही घटत आहे. या परिस्थितीत मुकणे धरणावर सर्व आशा केंद्रित झाल्या आहेत. अशातच आता वैतरणा धरणातून ओव्हरफ्लो होऊन अरबी समुद्रात जाणारे पुराचे पाणी मुकणेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ऊर्ध्व वैतरणाचे समुद्रात तीन टीएमसी पाणी जात असल्याचा अंदाज असून हेच पाणी सांडव्याद्वारे मुकणेत वळवल्यास एक टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध होऊ शकते. सध्याचे दीड व अतिरिक्त मिळणारे एक अशा प्रकारे अडीच टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास नाशिककरांना मुबलक पाणी मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...