आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुकेला धर्म नसतो:प्रवासी मजुरांच्या मदतीला धावले सर्वधर्मीय; कुठे शिख, कुठे मुस्लिम तर कुठे हिंदू समाजाकडून अन्न-पाण्याची व्यवस्था

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • नाशिकपासून कसारा घाटादरम्यान 80 किमीच्या अंतरात तीन मोठे लंगर लावण्यात आले आहेत
  • मजुरांसाठी दोन लंगर शिख समाजाने आणि एक लंगर मुस्लिम समाजाकडून लावण्यात आला आहे
  • हिंदू समाजाकडून टॅम्पो-रिक्शामधून जागो-जागी जाऊन अन्नाची पॅकेट आणि पाणी दिले जात आहे

जयप्रकाश पवार

फोटो क्रेडिट- अशोक गवळी

मुंबईवरुन यूपी, बिहार, मप्र, राजस्थान आणि दुसऱ्या राज्यांसाठी निघालेल्या मजुरांच्या समुहाने मुंबई-आग्रा हायवे भरला आहे. कडक उन्हात लंगर या मजुरांसाठी मोठा आधार बनत आहेत. कसारा (मुंबई)वरुन नाशिकदरम्यान जागो-जागी प्रवासी मजुरांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. 80 किलोमीटरच्या या अंतरात दोन मोठे लंगर शिख समाजाकडून तर एक लंगर मुस्लिम समाजाकडून चालवण्यात येत आहे.

याशिवाय हिंदू संघटनांकडून टॅम्पो-रिक्शामधून जागो-जागी जाऊन अन्नाचे पॅकेट आणि पाणी दिले जात आहे. नाशिकपासून 25 किमी दूर राजूर फाट्यावर शिख समाजाकडून निर्मला आश्रम तपस्थान लंगर चालवला जात आहे. येथून थोड्या अंतरावर वाडिवरे गावाजवळ मुस्लिमांची आशा जनजीवन बहुउद्देशीय फाउंडेशन मार्फतही मजुरांना जेवण दिले जात आहे.

तिसरे लंगर नाशिकपासून अंदाजे 65 किमी दूर मंगरूळमध्ये शिख समाजाकडूनच चालवले जात आहे. मंगळवारी जेव्हा आमची टीम तिथे पोहचली, तेव्हा हायवेवर पोहचली, तेव्हा अल्लामा इकबाल यांनी लिहीलेल्या ओळी 'मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्तां हमारा' आठवल्या.

उपाशी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करुन आपल्या घराकडे जाणाऱ्या मजुरांची सेवा हिंदू, मुस्लिम आणि सिख समाजाकडून केली जात आहे. खाणाऱ्याला आणि खाऊ घालणाऱ्याला एकमेकांचा धर्म माहित नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाज स्वतः उपाशी आहे, पण ते हाय वेवरुन जाणाऱ्या मजुरांना पोटभर जेवण देत आहेत.

कसारापासून पुढे गेल्यावर मुस्लिम समाजाकडून चालवण्यात येणारे लंगर दिसते. नाशिक उम्मीद जनजीवन बहुउद्देशीय फाउंडेशनमार्फत मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून येथे लंगर सुरू आहे. ही संस्था मजुरांना फळ, बिर्यानी, खिचडी आणि पाणी देण्याचे काम करते. संस्थेचे अजमल खान सांगतात की, चार ते पाच हजार लोक दररोज आपली भूक आणि तहान येथे भागवतात. लोक येतात, जेवण करतात आणि थोडा आराम करुन आपल्या पुढील प्रवासासाटी निघतात. 

शिखांच्या लंगरमध्येही 5-6 हजार लोग रोज जेवतात

शिख समाजाच्या लंगरमध्ये जेवणासोबतच ताक, पाणी आणि लस्सीदेखील दिली जात आहे. येथील हरविंदर सिंग सांगतात की, सकाळपासून रात्रीपर्यंत चालणाऱ्या या लंगरमध्ये रोज 5-6 हजार लोक आपली भूक-तहान भागवतात. या प्रवासी मजुरांकडे कोणतीच व्यवस्था नसल्याने ते नदीवर अंघोळ करत आहेत आणि रस्त्यात मिळेल तिथे खाऊन आपल्या प्रवासाला लागत आहेत.

मंगळवारी आमच्या टीमला झारखंडला जाणाऱ्या 70 लोकांचा समुह कसारा घाटात भेटला. समुहातील उमेश मंडल यांनी सांगितले की, आम्ही मागील दोन दिवसांपासून पायी चालत आहोत. आम्ही याची सूचना डेप्यूटी कलेक्टरांना दिली आहे. यानंतर या सर्वांना बसमधून सेंधवा बॉर्डरपर्यंत सोडण्यात आले. सरकार या मजुरांना बॉर्डरवर सोडण्यासाठी बसची व्यवस्था करत आहे, परंतू अनेक मजुरांना याची कल्पनाच नाही. 

बातम्या आणखी आहेत...