आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1993 बॉम्बस्फोट:गँगस्टर टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या तुरुंगात मृत्यू, सकाळीच आला होता हार्ट अटॅक

नाशिक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1993 साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचणे, फ्लॅट देण्याचे होते आरोप

कुख्यात गँगस्टर टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला तुरुंगातच असताना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. युसूफ मेमन हा मुंबई बॉम्बस्फोटातील फरार दहशतवादी आणि गँगस्टर टायगर मेमनसह फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनचा भाऊ आहे.

पोलिसांनी अद्याप युसूफ मेमनच्या मृत्यूचे कारण औपचारिकरित्या जाहीर केलेले नाही. सध्या त्याला हार्ट अटॅक आला होता या दिशेने तपास सुरू आहे. त्याचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी धुळ्यात नेण्यात आला आहे.

2015 मध्ये याकूबला फाशी

याकूबला बॉम्बस्फोट प्रकरणी 30 जुलै 2015 रोजी नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. तर टायगर अजुनही फरार आहे. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात युसूफ देखील दोषी सापडला होता. तसेच तो नाशिकच्या केंद्रीय कारागृहात कैद होता. युसूफ मेमन आणि ईसा मेमन हे दोघे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी जेलमध्ये होते. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, प्लॅट देणे असे आरोप होते. ईसा मेमनला ब्रेन ट्युमर आहे. आरोग्याच्या समस्यांमुळे 13 वर्षानंतर 2008 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती.

टायगर मेमनचे कुटुंब

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले 4 जण टायगर मेमनच्या कुटुंबातून आहेत. यातील एक भाऊ याकूब मेमनला फाशी झाली. तो कुटुंबात सर्वात मोठा भाऊ होता. काही वर्षांपूर्वी पुराव्यांच्या आभावी त्याची जामीनावर सुटका झाली. याकूबचे भाऊ ईसा आणि युसूफ या दोघांना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. टायगर आणि अयुब हे दोघे सध्या फरार आहेत. याकूबची वहिणी अर्थात सुलेमानची पत्नी रुबीना पुणे तुरुंगात आहेत. तर याकूबच्या पत्नीला जामीनवर सोडण्यात आले आहे. या सर्वांचा वडील अब्दुल रज्जाक आणि आई हनीफा यांच्यावर सुद्धा बॉम्बस्फोटाचे आरोप लागले. ते जामीनावर सुटले. यानंतर 2001 मध्ये रज्जाकचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...