आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:मुंबई उच्च न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी ‘नॉट बिफोर मी’ शेऱ्यामुळे तहकूब

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या कोपर्डी खटल्यातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी “नॉट बिफोर मी’ हा शेरा देत नकार दिल्याने सोमवारी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे हा खटला आता दुसऱ्या न्यायमूर्तींकडे वर्ग केल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे.

१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी तेथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने राज्यभर आक्रोशाची ठिणगी पडली होती. या घटनेचे गांभीर्य बघून, याचा वेगाने तपास करण्यात आला व खटलाही चालवण्यास घेण्यात आला. त्यानुसार जितेंद्र शिंदे ऊर्फ पप्पू (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२६) या तीन आरोपींना २२ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगर सत्र न्यायालयाने बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपींकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यापुढे याची सुनावणी सुरू होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात न्यायालयाचे कामकाज थंडावले होते. त्यानंतर न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याचे कामकाज सुरू होणार होते.

लवकरच पुन्हा सुनावणीस सुरुवात होईल
असे असले तरी लवकरच हे प्रकरण आता दुसऱ्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येईल आणि खटल्याची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयातील सुनावणी दृष्टिक्षेपात असल्याने पीडित मुलीच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. - अॅड. उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी वकील

बातम्या आणखी आहेत...