आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती व शक्तीचे दर्शन:मानाच्या तेल्या-भुत्याच्या कावडीसह अनेक कावडीने केला मुंगी घाट सर

नातेपुते2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिध्द भगवान शंकरांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली. अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढण्याचा सोहळा बघण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना यावेळी भक्ती व शक्तीचे दर्शन घडले. महाराष्ट्रातून आलेल्या कावड मुंगी घाट चढल्यानंतर शेवटी मानाची असणारी पुरंदर तालुक्यातील संत तेल्या भुत्याच्या कावडने सायंकाळी ५ वाजता मुंगी घाट सर करायला सुरुवात केली. सर्व भाविकांनी ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला. त्यानंतर शंभू महादेवाच्या मंदिरात पोहोचल्यावर महादेवाला पवित्र जलअर्पण करण्यात आले. कवड मुक्कामाच्या ठिकाणी गेली.

मुंगी घाटातून जातात ४०० कावड एकादशीपासून त्रयोदशीपर्यंत या घाटातून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून आलेल्या ४०० कावडी सुमारे ३०० फुट उंच घाट मानवी साखळीद्वारे चढून जातात. तेल्या भुत्याची ही मानाची कावड सर्वात शेवटी घाटातून नेली जाते.

घाटातून पडून चारजण जखमी कावड घेऊन येताना चौघे जण मुंगी घाटातून खाली कोसळल्याची दुर्घटना घडली. सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांनाही घाटातून वर आणून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.