आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी फायरसेच्या जाचातून उद्योजकांची लवकरच सूटका:महापालिका आयुक्तांचे आयमाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका आयुक्तांना समस्यांबाबतचे निवेदन सादर करतांना आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व पदाधिकारी. - Divya Marathi
महापालिका आयुक्तांना समस्यांबाबतचे निवेदन सादर करतांना आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व पदाधिकारी.

दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची सुटका करण्यासाठी फायर स्टेशन ताब्यात घेण्याची नाशिक महानगरपालिकेची तयारी आहे.या संदर्भात एमआयडीसीच्या मुख्याधिकाऱ्यांना लवकरच पत्र पाठवून त्यांची मंजुरी घेतली जाईल,असे आश्वासन आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. हा निर्णय झाल्यास जवळपास 2500 उद्याेजकांना याचा फायदा हाेऊ शकणार आहे.

शहरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांच्या दालनात आयमाचे पदाधिकारी, महापालिका आणि एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना फायरसेस महापालिका आणि एमआयडीसी यांसारख्या दोन यंत्रणांकडून वसुल हाेऊ नये असे आपले मत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

कारखान्यांतील रसायन व जलमिश्रित सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी सीईपीटीउभारण्याचा मुद्दा चर्चेला आला. याबाबत छोटा सीईपीटी उभारायची तयारी एमआयडीसीने दाखवली आहे, मात्र कारखान्यांमधून वाहून जाणारे हे पाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिनीत टाकण्याची मुभा हवी आहे आणि टेरी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लॅबने त्यास हिरवाकंदील दाखवला असल्याचे निदर्शनास आणले असता या दोन्ही यंत्रणांचे मार्गदर्शन मागवू तसेच त्यांच्याकडून दुजाेरा मिळाल्यास तशी परवानगी देण्यास अडचण नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

चर्चेत आयमातर्फे माजी अध्यक्ष धनंजय बेळे,उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब,कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, चिटणीस गोविंद झा,योगिता आहेर,एमआयडीसीतर्फे नितीन गवळी,बाळासाहेब झांज्जे,जे.सी. बोरसे,जयंत पाटील तसेच महापालिकेतर्फे उपायुक्त अर्चना तांबे आणि संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पाऊस थांबल्यावर रस्त्यांची डागडुजी

औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे याकडे लक्ष वेधले असता पाऊस थांबला की रस्त्यांची डागडुजी करून देतो असे ते म्हणाले. औद्योगिक वसाहतीत अवजड वाहनांची वर्दळ जास्त असल्याने सर्वांच्या हिताच्या दृष्टीने नंतर हे सर्व रस्ते ट्रीमिक्सचे करण्यासाठी पावले उचलली जातील असे आयुक्तांनी आश्वस्त केल्याचे पांचाळ म्हणाले.

या प्रश्नांबाबत आयुक्तांचे आश्वासन

  • औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र वेगळ्या रंगाच्या घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.
  • पथदीपांच्या दुरुस्तीचा प्रश्न सोडविला जाईल.
  • गोंदे तसेच विल्होळी तसेच नाशिकहून ओझर विमानतळ अशी सिटीलिंक बससेवा सुरू करण्याचा विचार करणार.
  • एसटीपी उभारण्यासाठी अमृत योजनेंतर्गत डीपी प्लॅन काढून अंदाजपत्रकीय तरतुदीसाठीचा प्रस्ताव अतिरिक्त विकासासाठी सादर करू.
बातम्या आणखी आहेत...