आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्तांकडे काँग्रेसचे साकडे:शालेय पोषण आहारासाठी बचत गटांना न्याय देण्याची मागणी

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय पोषण आहार योजनेबाबत अपात्र बचत गटांना न्याय द्यावा यासाठी नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांचे नेतृत्त्वाखाली महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार यांना भेटून निवेदन दिले.

निवेदनात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती मागवून त्याबाबत ई - निविदा 26 मे 2022 ते 15 जून 2022 पर्यंत मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने बचत गटांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर कॅफे मधुन अर्ज सादर केले.

चुकांची कल्पना ह्या महिलांना नसल्याने तांत्रिक बाबींमुळे अपात्र होऊ याची पुसटशी कल्पनाही नसल्याने त्या आज गोंधळून गेल्या आहेत. ह्यात त्यांची चुक ठरविता येणार नाही. मनपा शिक्षण विभागाने दिलेली अपात्रतेची कारणं इतकी गंभीर किंवा खुप मोठी आहेत असं नसल्याचे कारण शालेय पोषण आहार योजना राबविण्याबाबत मनपाला हवे असलेले सर्वच पेपर संबंधित बचत गटांकडे आहेत फक्त ते सायबर कॅफेवाल्याने ऑनलाईन भरणे आवश्यक होते ते न भरल्याने राहील्याची शिक्षा ह्या होतकरू, गरीब महिलांना देऊ नये असे नमुद केले.

खिचडीबाबत त्यांना अनुभव असून यापुर्वी महिला बचत गटाच्या माध्यमातून दिलेल्या खिचडीमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची तक्रार कुठेही झालेल्या नाहीत. काही त्रुटी राहिल्या असतील त्या ऑफलाईन घेऊन संबंधित अपात्र महिला बचत गटांना न्याय द्यावा, निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या महिलांना न्याय मिळत नसेल तर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने येत्या तीन चार दिवसांनी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यापूर्वी देखील आम्ही महापालिकेच्या राजीव गांधी भवन कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते त्यानुसार मनपा आयुक्त जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अशोक शेंडगे, माया पगारे, मिना शेख, मंदा वाघ, छाया गांगुर्डे, निर्मला पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...