आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकांचा मुहूर्त अखेर नववर्षातच:20 डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम, इच्छुकांचा हिरमाेड

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ मार्च २०२२ राेजी अर्थातच जवळपास नऊ महिन्यापासून महापालिका निवडणुक प्रक्रियेला नानाविध कारणामुळे असलेली स्थगिती आज झालेल्या सुनावणीतही कायम राहीली असून २० डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवल्यामुळे आता नववर्षातच निवडणुकांचा मुहूर्त निघणार आहे. दुसरीकडे, महापालिकेने नव्याने प्रभाग रचना करण्यासंदर्भात काढलेले आदेशावर अंमलबजावणी कशी करायची याचा पेच कायम असून पालिकेला शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे निवडणुकाचा चक्का जाम झाला आहे.

नाशिकसह राज्यातील १८ महापालिकाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर जवळपास दहा महिन्यापासून काही ना काही कारणामुळे निवडणुक प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. २०२१ मध्ये जनगणना न झाल्याचे कारण देत २०११ मधील जनगणनेच्या आधारावर प्रभागांची संख्याही वाढवली. परिणामी नाशिक महापालिकेत १२२ एेवजी १३३ इतक्या जागांची निर्मिती झाली.

तीन सदस्यीयपदधतीने ४३ तर एक प्रभाग चार सदस्यीय याप्रमाणे ४४ प्रभागांची निर्मितीही झाली. या प्रभाग रचनेवर ओबीसी आरक्षणासह सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदे -फडणवीस सरकारने ४ ऑगस्ट २०२२ च्या सुमारास यापुर्वीची प्रक्रिया रद्द करून २०११च्या जनगणनेनुसारच नगरसेवकसंख्या निश्चित केली.नाशिकचा विचार केला तर पुन्हा १२२ इतके प्रभाग झाले. दरम्यान, त्याविराेधात पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली.

दिवाळीपुर्वी हा वाद मिटू शकला नाही. त्यानंतर निवडणुका हाेतील अशी अटकळ असताना न्यायालयाकडून विविध कारणामुळे प्रक्रीया पुढे जात आहे. अशातच, राज्य शासनाने २२ नोव्हेंबर रोजी नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश काढले. १२२ सदस्य संख्येनुसार ही रचना करणे अपेक्षित असली तरी, प्रभाग नेमक्या किती सदस्यांचा हे स्पष्ट झाले नाही.

हिवाळी अधिवेशनात हाेणार चार सदस्यीय प्रभागाचा फैसला

शिंदे -फडणवीस सरकार यांना चार सदस्यीय प्रभागात रस असल्याची चर्चा आहे. यापुर्वी २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच भाजपाने सत्ता मिळवली हाेती. आता, तीन सदस्यीय प्रभाग रचना असून जर भाजपाला चार सदस्यीय प्रभाग करायचा असेल तर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवीन विधेयकाला मंजुरी घेवून कायदा करावा लागेल.

..तर एप्रिलनंतर निवडणुका शक्य

ओबीसी तसेच प्रभागरचना संदर्भात सर्वोच्च न्याालयात सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ९ डिसेंबर ऐवजी १३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.तर प्रभागरचने संदर्भातील उच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी आता २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर नाताळनिमित्त सुट्टी असल्यामुळे जानेवारी महिन्यात सुनावणी हाेईल. त्यानंतर जर काेणतेही आदेश पारीत झाले तरी फेब्रूवारी-मार्चमधील परीक्षेचा कालावधी लक्षात घेत निवडणुका या एप्रिलनंतरच हाेऊ शकतील अशी शक्यता पालिका अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...